www.24taas.com, झी मीडिया, थिंपू
भूतानच्या खासदारांनी टाळ्या न वाजवण्याची आपली कित्येक वर्षांची परंपरा तोडलीय... तीही भारताचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी...
सोमवारी भूतान संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदीत केलेल्या भाषणाला उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
भूतानमध्ये वाईट शक्तींना दूर पळवून लावण्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. कुणाचं स्वागत करताना किंवा प्रोत्साहन देण्यासाठी इथं टाळ्या वाजवल्या जात नाहीत.
मोदींच्या भाषणानंतर संसदेत नॅशनल असेम्बली तसंच नॅशनल काऊन्सिलच्या सदस्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हेदेखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी, भाषणासाठी मोदींकडे तयार भाषण होतं... पण, त्यांनी आपल्या अंदाजात जवळपास 45 मिनिटं इथं भाषण केलं. उपस्थित सदस्यांनीही त्यांना बारकाईनं ऐकलं. मोदींच्या भाषणाचा अनुवाद करण्यासाठी इथं दुभाषिही उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.