७७५ फूटांच्या उंचीवर इमारती लटकला ‘बॅटमॅन’!

मेलबर्नची सगळ्यात उंच इमारत... इमारतीच्या काचेच्या भिंतीतून काही लहान मुलं खाली डोकावून पाहतायत... आणि अचानक त्यांच्यासमोर उभा ठाकतो ‘बॅटमॅन’... ९७५ फूटांच्या उंचीवर... इमारतीला बाहेरच्या बाजूनं लटकलेल्या अवस्थेत... मुलं त्याला पाहून अवाक होतच आहेत तोवर बॅटमॅनच्य सोबत कॅटवूमनही इथं दाखल होते...

Updated: Oct 17, 2014, 01:06 PM IST
७७५ फूटांच्या उंचीवर इमारती लटकला ‘बॅटमॅन’! title=

मेलबर्न : मेलबर्नची सगळ्यात उंच इमारत... इमारतीच्या काचेच्या भिंतीतून काही लहान मुलं खाली डोकावून पाहतायत... आणि अचानक त्यांच्यासमोर उभा ठाकतो ‘बॅटमॅन’... ९७५ फूटांच्या उंचीवर... इमारतीला बाहेरच्या बाजूनं लटकलेल्या अवस्थेत... मुलं त्याला पाहून अवाक होतच आहेत तोवर बॅटमॅनच्य सोबत कॅटवूमनही इथं दाखल होते...

आणि मग काय... बच्चे कंपनीची एकच धमाल... सगळे जण आपल्या सुपरहिरोला समोर पाहून खूपच आनंदीत झाले होते...

रिलमध्ये नाही रिअल लाईफमध्ये ही घटना मुलांना अनुभवायला मिळाली. पण, स्टंटची ही कवायत एका ‘चॅरिटी’ कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. स्टंटमॅन असलेल्या क्रिस आणि रोविना यांनी रिअल लाईफमध्ये बॅटमॅन आणि कॅटवूमनची भूमिका निभावली.

'सुपर बॉस डे'दिनाच्या निमित्तानं 'हार्टकिड्स' या संस्थेच्यावतीने चॅरिटीद्वारे जन्माताच हृदय विकारग्रस्त असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं... ‘हार्टकिडस’च्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये दररोज जन्माला येणाऱ्या मुलांपैकी सहा मुलांना हृदय विकाराचा त्रास असतो. ही मुलं जास्तीत जास्त एका वर्षांपर्यंत जगू शकतात.

अशाच मुलांना उपचार मिळावेत, यासाठी, हार्टकिडस अनेकदा अशा कार्यक्रमांचं आयोजन करते आणि जमा झालेले पैसे या मुलांच्या उपचारावर खर्च केले जातात.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.