चीनमध्ये झालेल्या अपमानावर बोलले बराक ओबामां

चीनमध्ये झालेल्या अपमानावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी उत्तर दिलं आहे. ओबामांनी म्हटलं की, दोन्ही देशाचे अधिकाऱ्यांमधील वादामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर असलेले मतभेद समोर आले आहे.

Updated: Sep 6, 2016, 11:58 AM IST
चीनमध्ये झालेल्या अपमानावर बोलले बराक ओबामां title=

वॉशिंग्टन : चीनमध्ये झालेल्या अपमानावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी उत्तर दिलं आहे. ओबामांनी म्हटलं की, दोन्ही देशाचे अधिकाऱ्यांमधील वादामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर असलेले मतभेद समोर आले आहे.

शनिवारी विमानतळावर अमेरिका आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. ओबामांनी म्हटलं की, 'माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर चीन आणि अमेरिका यांच्यात मदभेद आहे हे या घटनेमुळे समोर आलं. पण प्रत्येक देशाचे आपले मूल्य आणि आदर्श असतात जे जगभरात प्रवास करतांना सोडून देता येत नाहीत.'