www.24taas.com, झी मीडिया, स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंडमध्ये येत्या आठवड्यात होणाऱ्या लिलावात जगातील सर्वांत मोठा नारंगी हिरा ठेवण्यात येणार आहे. या दुर्लक्ष हिऱ्यासाठी जवळजवळ १.७ ते २ करोड डॉलर (१२० करोड रुपयांपेक्षा जास्त) मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जेनेवातील ‘क्रिस्टीज’ या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या डिव्हिजन प्रमुख जॉन मार्क लुनल यांच्या म्हणण्यानुसार, हा हिरा खूपच दुर्मिळ आहे... तसंच हा जगातील सर्वात मोठा नारंगी हिरा आहे... १४.८२ कॅरेटच्या या हिऱ्याचा आकार एखाद्या बदानामाएव्हढी आहे.
हा हिरा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता... परंतु या हिऱ्याला कुणी विकलंय त्याचं नाव सांगण्यास मात्र क्रिस्टीजनं नकार दिला. या शुद्ध नारंगी हिऱ्याला ‘फायर डायमंड’ही म्हटलं जातं.
जिनिव्हामध्ये नोव्हेंबरमध्ये क्रिस्टीजच्या पारंपरिक ज्वेलरीचा लिलाव होणार आहे, यातच या हिऱ्याचाही समावेश आहे. यानंतर याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी एक लिलाव करणारा एक समूह एका गुलाबी हिऱ्याचाही लिलाव करणार आहे. हा हिरा ५९.६० कॅरेटचा असून या हिऱ्याची किंमत जवळजवळ ६ करोड डॉलर सांगितली जातेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.