आठ वर्षाची चार्ली कमवते तब्बल ८० लाख

जेव्हा तुम्ही आठ वर्षाचे होते तेव्हा काय करायचे? शाळेत न जाण्याची कारणे शोधत असाल किंवा मित्रांसोबत मजामस्ती करत असाल. तुम्ही असंही बोलाल की या वयात आम्ही काय ८० लाख रूपये महिन्याला थोडीच ना कमवणार होतो.

Updated: Apr 18, 2015, 07:42 PM IST
आठ वर्षाची चार्ली कमवते तब्बल ८० लाख  title=

नवी दिल्ली: जेव्हा तुम्ही आठ वर्षाचे होते तेव्हा काय करायचे? शाळेत न जाण्याची कारणे शोधत असाल किंवा मित्रांसोबत मजामस्ती करत असाल. तुम्ही असंही बोलाल की या वयात आम्ही काय ८० लाख रूपये महिन्याला थोडीच ना कमवणार होतो.

मात्र आठ वर्षाचीच चार्ली यूट्युबवर फूड चॅनल चालवून प्रत्येक महिन्याला ८० लाख कमवत आहे. चार्ली एका स्टार शेफ आहे. 

ऑस्ट्रेलियाची रहिवासी असलेली चार्लीचं पूर्ण नाव मिनी मार्था स्टिवर्ट आहे. चार्लीला कॅन्डी, पेस्ट्री आणि केक बनवण्याची आवड आहे. चार्लीची आवड ओळखून चार्लीच्या आई-वडिलांनी चार्लीचं यूट्युबवर अकाऊंट सुरू केलं, ज्याला चार्लीज क्राफ्टी किचन नाव दिलं गेलं. चार्ली लोकांना सोप्या पद्धतीने कॅन्डी, पेस्ट्री, केक बनवायला शिकवते, तर चार्लीची छोटी बहीण अॅश्ले चॅनलची 'चीफ टेस्ट टेस्टर' आहे.

ऑनलाइन अॅडर्व्हटाईसिंग कंपनी  'एड एज' आणि 'आउटरिगर मीडिया'ने यूट्युबच्या स्टारच्या कमाईची रॅंकिंग प्रसारीत केली होती. ज्यात 'चार्लीज क्राफ्टी किचन' शो पहिल्या स्थानवर होता. या चॅनलला आजवर ३ कोटी पेक्षा जास्त वेळा पाहण्यात आलं आहे. चार्लीने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात २०१२ मध्ये अवघ्या सहाव्या वर्षी केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.