या 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री

इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Jan 28, 2017, 09:39 PM IST
या 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री  title=

वॉशिंग्टन : इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम दहशतवादापासून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय नव्यानंच निवडून आलेल्या ट्रम्प सरकारनं घेतला आहे. पुढच्या 90 दिवसांपर्यंत या सातही देशातल्या नागरिकांना व्हिजा देण्यात येणार नाही, पण या देशातून अमेरिकेत येणाऱ्या ख्रिस्ती नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे.

निवडणूक लढवतानाच ट्रम्प यांनी दहशतवाद रोखायचा असेल तर मुस्लिम लोंढे रोखण्याचा मुद्दा प्रचारात आणला होता. दहशतवादापासून अमेरिकेचं संरक्षण करण्यासाठी या नवा नियम बनवण्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.