www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
मीच अजमल कसाबला शाळेत असताना शिकवलं होतं. पण, तो नाही ज्याला भारतात मुंबई दहशतावादी हल्ल्यातील दोषी म्हणून फासावर चढवण्यात आलं’ असा दावा अजमल कसाबच्या एका शिक्षकानं केलाय.
पाकिस्तानच्या फरीदकोटच्या प्राथमिक शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षकानं हा दावा केलाय. दहशतवाद विरोधी कोर्टात 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सुनावणी करत आहे.
पाकिस्तानातील पंजाब सूब्यातील ओकरा जिल्ह्याच्या फरीदपूरच्या एका शिक्षकाची साक्ष या खटल्यात बुधवारी नोंदवण्यात आली. या शिक्षकांनी शाळेतील रेकॉर्ड दाखवत ‘अजमल कसाब जिवंत आहे. भारतात ज्याला फाशी दिली गेली तो कुणी दुसराच होता’ असं म्हटलंय. यानंतर कोर्टानं पुढची सुनावणी 14 पर्यंत पुढे ढकललीय. कसाबनं याच गावातील शाळेत शिक्षण घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.
अजमल कसाबला (25 वर्ष) मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलं होतं. त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात गोपनीय पद्धतीनं फाशी दिली गेली होती.
पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या खटल्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याच्यासहीत आणखी सात आरोपी आहेत. त्यांच्यावर मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी आर्थिक मदत देण्याचा आणि साजिश रचण्याचा आरोप करण्यात आलाय. हे सगळे जण अडियाला तुरुंगात कैद आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.