पेशावर : 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के' ही म्हण कधी तुम्ही ऐकलीये का? या म्हणीवर जर तुमचा विश्वास नसेल, तर तो आता होईल. कारण, पाकिस्तानातल्या पेशावर शहरातील एका महिलेने एकाच वेळी तब्बल पाच बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.
'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय बीबी आसिया हिने शुक्रवारी पेशावरमधील खैबर टीचिंग हॉस्पिटलात पाच बाळांना जन्म दिला. यात चार मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. पण, दुर्देवाने यातील दोन बाळे दगावली आहेत. तिसऱ्या मुलाची प्रकृती गंभीर असली तरी डॉक्टर त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत.
ही महिला चौथ्यांदा आई होतेय. याआधी तिला नॉर्मल डिलीव्हरीच्या माध्यमातून तीन बाळं झाली आहेत.