अवघ्या आठ वर्षांची चिमुरडी... आत्मघातकी दहशतवादी!

अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी दहशतवादी हल्ल्यांसाठी लहान मुलांचाही वापर करायला सुरुवात केलीय, हे आता स्पष्ट झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 7, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, अफगाणिस्तान
अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी दहशतवादी हल्ल्यांसाठी लहान मुलांचाही वापर करायला सुरुवात केलीय, हे आता स्पष्ट झालंय. स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी आत्मघाती बाँबस्फोट घडवणाच्या तयारीत असलेल्या आठ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतलंय. या मुलीच्या भावानेच तिला मानवी बाँम्ब म्हणून तयार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अफगाणिस्तानमील दक्षिण भागातील हेल्मंद प्रांतात रविवारी रात्री सुरक्षा यंत्रणांनी एका चिमुरडीला ताब्यात घेतले आहे. या मुलीने स्फोटक पदार्थ असलेले जॅकेट घातले होते व ती स्थानिक सीमा सुरक्षा दलाच्या दिशेने जात होती, असं स्थानिक तपास यंत्रणांनी म्हटलंय.
सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीजवळ बॉम्बस्फोट घडवण्याचा तिचा प्रयत्न होता. ही मुलगी तालिबानी कमांडरची बहिण असून त्यानेच तिला यासाठी तयार केले असावं, असा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित मुलीला जॅकेटवरील बटण दाबता आलं नाही... तिच्याकडे पाहताना सैन्यातील एका जवानाला संशय आला. चौकशी केली असता तिच्या शरीरावर बॉम्ब सापडला.
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. मात्र, दहशतवादी संघटनांनी एवढ्या लहान मुलांचा वापर सुरु केल्यानं हल्ले रोखण्याचं नवीन आव्हान जगभरातील सुरक्षा यंत्रणांसमोर उभे राहिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.