रोम: लिबियामध्ये एक प्रवासी जहाजाचा अपघात झालाय. मोठ्या प्रवासी जहाजात प्रवास करणाऱ्या जवळपास ७०० प्रवाशांचा मृत्यू झालाय. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू झालंय.
मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा जहाज इटलीच्या लँपेड्यूसा किनारपट्टीपासून जवळपास १२० किलोमीटर दूर होतं. अपघातानंतर आतापर्यंत २८ जणांना वाचविण्यात आलंय.
बचावलेल्या प्रवाशांनी सांगितलं की, जहाजात एका बाजूनं वजन वाढल्यानं ते उलटलं. काही लोक डेकवर फसले होते आणि नंतर त्यांना वाचवलं गेलं. सध्या इटलीचे कोस्टगार्ड आणि नेव्हीचं बचावकार्य सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.