महिलेने आधी 6 आणि आता 8 मुलांना दिला एकसोबत जन्म

आत्तापर्यंत तुम्ही जुळे किंवा तिळे मुलांबाबत ऐकलं असेल पण कॅलिफोर्नियामध्ये नेटली सुलेमानने 2009 मध्ये एकसोबत 8 मुलांना जन्म दिला होता. यानंतर ती खूपच प्रसिद्ध झाली होती. टीव्ही चॅनल, चॅट शो आणि रेडियो शो मध्ये नेटलीचा उल्लेख होऊ लागला. पण काही दिवसानंतर ती वादात सापडली आणि मग काही दिवस गायबच झाली.

Updated: Sep 13, 2016, 10:58 PM IST
महिलेने आधी 6 आणि आता 8 मुलांना दिला एकसोबत जन्म title=

कॅलिफोर्निया : आत्तापर्यंत तुम्ही जुळे किंवा तिळे मुलांबाबत ऐकलं असेल पण कॅलिफोर्नियामध्ये नेटली सुलेमानने 2009 मध्ये एकसोबत 8 मुलांना जन्म दिला होता. यानंतर ती खूपच प्रसिद्ध झाली होती. टीव्ही चॅनल, चॅट शो आणि रेडियो शो मध्ये नेटलीचा उल्लेख होऊ लागला. पण काही दिवसानंतर ती वादात सापडली आणि मग काही दिवस गायबच झाली.

नेटलीने तिच्या लाईफस्टोरी शेअर केली आहे.  नेटली म्हणते की, आयवीएफ ट्रीटमेंटने तिने 8 मुलांना जन्म दिला. या आधीही तिने याच ट्रीटमेंटने 6 मुलांना जन्म दिला होता. पण त्यानंतर ती अडचणी आली होती.

नेटली म्हणते की, माझ्याकडे काम नव्हतं. ज्यामुळे मुलांचा सांभाळ करणं कठिण झालं होते. आजुबाजुचे लोकं वाईट बोलू लागले त्यामुळे मानसिक त्रास झाला.

14 मुलांची आई नेटलीने पॉर्न फिल्ममध्ये देखील याआधी काम केले होते. पण मुलं झाल्यानंतर तिने हे काम सोडून दिलं. नेटलीला मीडिया आउटलेट्सने न्यूड पोडसाठी 67 लाख रुपयांची ऑफर केली होते. त्यानंतर तिने दो-तीन मीडिया कंपनीसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं.