व्हिडिओ : जगातील सर्वात भयंकर मिलिट्री ट्रेनिंगचे पाच प्रकार

लष्कराची ट्रेनिंग अत्यंत भयंकर असते हे आपण ऐकत आलो आहोत. पण ती किती भयंकर असते याचे पाच उदाहरण आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत. पाहा हा खतरनाक व्हिडिओ

Updated: Dec 1, 2015, 05:38 PM IST

न्यू यॉर्क : लष्कराची ट्रेनिंग अत्यंत भयंकर असते हे आपण ऐकत आलो आहोत. पण ती किती भयंकर असते याचे पाच उदाहरण आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत.

5 . अमेरिकेच्या सैनिकांना जंगलात जिवंत राहण्यासाठी गरज पडल्यास कोब्रा यासारख्या भयानक सापाचं रक्तही प्यावं लागू शकतं. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणादरम्यान दिलं जातं कोब्रा सापाचं रक्त, किडे आणि इतर प्राण्याचं कच्चे मांस खावे लागले. वेळ प्रसंगी कोंबडीला दातांनी जिवंत मारावे लागते.

4. कोरिया आणि चीन आपल्या सैनिकांना आणखी मजबूत करण्यासाठी डोक्याने आणि हाताने सिमेंटच्या लाद्या फोडायला देतात. ज्यामध्ये त्यांना जळत्या लाद्याही डोक्याने फोडण्यास सांगितल्या जातात.

3. अमेरिकेच्या नौदलातील सैनिकांना त्यांचे पाय आणि हात बांधून समुद्रात टाकलं जातं. त्यानंतर त्यांना 5 मिनिटं पाण्याच्या आत रहावं लागतं आणि नंतर डोक्याच्या सहाय्याने पोहावं लागतं. त्यानंतर एक माणूस त्यांना पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांना त्यांचा संघर्ष करूण त्याच्यावर मात करायची असते.

2. रशियाच्या स्पेशल फोर्सला बुलेटप्रुफ जॅकेट घालून एकमेकांच्या छातीवर गोळ्या चालवण्यास सांगितलं जातं. ज्यामुळे त्यांना शत्रूला नेमकं टार्गेट करता येतं.  

1. चीनच्या सैनिकांना प्रशिक्षणादरम्यान जिवंत बॉम्ब हातात घेऊन तो 5 सैनिकांमध्ये फिरवला जातो. त्यानंतर तो एका खड्यात टाकला जातो आणि त्याचा स्फोटापासून त्यांना स्वत:चं रक्षण करायचं असतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.