सेक्स स्कँडलनं पोलीस खात्याला पोखरलं

सेक्स स्कँडलनं कॅलिफोर्नियाच्या पोलीस खात्याला पोखरलं आहे. या स्कँडलमध्ये तब्बल 31 पोलीस अधिकारी अडकल्याची माहिती मिळत आहे. 

Updated: Jun 17, 2016, 06:01 PM IST
सेक्स स्कँडलनं पोलीस खात्याला पोखरलं  title=

कॅलिफोर्निया : सेक्स स्कँडलनं कॅलिफोर्नियाच्या पोलीस खात्याला पोखरलं आहे. या स्कँडलमध्ये तब्बल 31 पोलीस अधिकारी अडकल्याची माहिती मिळत आहे. वेश्यागृहांवर कधी धाड पडणार आहे, याची माहिती हे पोलीस आधीच द्यायचे, तसंच अल्पवयीन मुलींना सेक्समध्ये अडकवल्याचा आरोपही या पोलिसांवर आहे.

मी 31 पोलिसांची संबंध ठेवल्याचे यातल्याच एका मुलीनं सांगितलं आहे. सेलेस्ट गुआप या नावानं या तरुणीनं फेसबूकवर स्टेटस टाकलं आहे. तसंच अल्पवयीन असल्यापासून हा प्रकार सुरु असल्याचा दावा तिनं केला आहे. 

या प्रकरणी कॅलिफोर्नियाच्या पोलीस प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला आहे, तसंच काही पोलीस अधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.