सिएटल, अमेरिका : एका पुरुषावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. इंग्रजी वेबसाइट डेली मेलनं दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या सिएटलमध्ये २६ वर्षीय एका महिलेनं पुरुषाच्या घरात शिरून त्याचे हात-पाय बांधून त्याच्यावर बलात्कार केल्याचं कळतंय. पीडित पुरुषानं महिलेविरोधात तक्रार दाखल केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला पीडित पुरुषाच्या बाजूच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. महिला ड्रग्ज अॅडिक्ट होती, असंही पीडित पुरुषानं सांगितलं.
घटनेपूर्वी पीडित एका बर्थडे पार्टीतून थकून घरी परतला होता. थकल्यामुळं तो झोपला होता. अचानक रात्री दोन वाजता त्याची झोप अचानक उघडली, तर त्याला जाणवलं की, त्याचे हात वर डोक्याकडे बांधलेले आहेत आणि ५.७ फूट उंचीची महिला त्याच्यावर चढलेली आहे.
अनेक प्रयत्नांनंतर पीडित महिलेच्या तावडीतून सुटला आणि त्यानं थेट हॉस्पिटल गाठलं... टेस्ट करविण्यासाठी. दरम्यान, महिलेनं तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. (फोटो- सौजन्य- फेसबुक)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.