२१ जून... जागतिक योगा दिन म्हणून घोषित!

२१ जून हा आता जागतिक योगा दिन म्हणून घोषित करण्यात आलाय. संयुक्त राष्टांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. 

Updated: Dec 12, 2014, 04:13 PM IST
२१ जून... जागतिक योगा दिन म्हणून घोषित! title=

मुंबई : २१ जून हा आता जागतिक योगा दिन म्हणून घोषित करण्यात आलाय. संयुक्त राष्टांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांपुढे ठेवला होता. १७५ सदस्य देशांनी याला अनुमोदन दिलंय. अशा प्रकारचा हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 

योगामुळे आरोग्याबाबत एक पवित्र ऊर्जा निर्माण होते, असं संयुक्त राष्ट्रांच्या ड्राफ्टमध्ये म्हटलं होतं. योगाचा प्रसार आणि प्रचार व्हावा तसंच जास्तीत जास्त लोकांनी योगसाधनेने आपलं आपलं आरोग्य सुधारावं यासाठी या दिवसाच्या निमित्ताने प्रयत्न होऊ शकतात असं या ड्राफ्टमध्ये नमूद करण्यात आलंय. 

व्यायामाबरोबरच योगासनांचं महत्त्व सगळ्यांनाच पटू लागलंय. सेलिब्रेटींमध्येही योगाची क्रेझ दिसून येतेय. व्यस्त जीवनशैलीत स्वताला फिट ठेवण्यासाठी कलावंत मंडळी योगासनांचा आधार घेत आहेत. योग दिन जाहीर झाल्यानं योग प्रसार-प्रचारासाठी त्याची मदत होईल, असं सेलिब्रेटींना वाटतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.