जगातील पहिल्या 10 इंजिन विमानाचं यशस्वी परिक्षण!

अमेरिकन अंतरिक्ष एजंसी नासानं वर्जीनियामध्ये बॅटरीवर चालणारं जगातील पहिलं 10 इंजिन असलेल्या विमानाचं यशस्वी परिक्षण केलंय. 

Updated: May 5, 2015, 02:19 PM IST
जगातील पहिल्या 10 इंजिन विमानाचं यशस्वी परिक्षण! title=

न्यूयॉर्क: अमेरिकन अंतरिक्ष एजंसी नासानं वर्जीनियामध्ये बॅटरीवर चालणारं जगातील पहिलं 10 इंजिन असलेल्या विमानाचं यशस्वी परिक्षण केलंय. 

'ग्रीस्ड लाइटनिंग-10' नावाचं हे विमान हेलिकॉप्टर सारखं जमीनीवर उड्डाण करू शकतं. नासाचे एअरोस्पेस इंजीनिअर बिल फ्रेडरिक यांनी सांगितलं की, आमचं पुढील लक्ष्य हेलिकॉप्टरच्या तुलनेत याला चार पट मोठं आणि उत्तम बनविण्याचं काम करतोय.

विमानाचं वैशिष्ट्ये -
- जमीनीपासून सरळ उडणारं बॅटरीवर चालणारं विमान
- छोट्या प्रमाणात येण्याजाण्यासाठी उत्तम
- कृषिची पाहणी, नकाशांसाठी उपयुक्त
- चार जणांसाठी उत्तम विमान
- 3.05 मीटर एअरक्राफ्टच्या पंख्यांचा प्रसार
- 8 मोटर पंख्यावर लागलेल्या
- 2 मोटर विमानाच्या मागील बाजूला लागलेल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.