‘ओसामा’च्या मुलाला हवंय कॉन्ट्रक्ट

फुटबॉल वर्ल्डकप - २०२२ चं यजमानपद कतारला मिळालंय. याच फुटबॉल वर्ल्डकपचं कॉन्ट्रक्ट मिळवण्यासाठी कतारमधल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीनं प्रयत्न सुरू केलाय. या कंपनीचं नाव आहे, ‘कतार बिन लादेन ग्रुप’…

Updated: Jun 14, 2012, 02:34 PM IST

www.24taas.com, दोहा, कतार

 

फुटबॉल वर्ल्डकप - २०२२ चं यजमानपद कतारला मिळालंय. याच फुटबॉल वर्ल्डकपचं कॉन्ट्रक्ट मिळवण्यासाठी कतारमधल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीनं प्रयत्न सुरू केलाय. या कंपनीचं नाव आहे, ‘कतार बिन लादेन ग्रुप’…

 

दोन वर्षापूर्वी ‘कतार बिन लादेन ग्रुप’ ची सुरुवात उमर बिन लादेन यानं केलीय. उमर हा ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख, क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याचा मुलगा आहे. ‘कतार बिन लादेन ग्रुप’नं हे कॉन्ट्रक्ट मिळवण्यासाठी स्नेनमधल्या ‘कॉपरोसा’ या कंपनीशी हातमिळवणी केलीय. या नवीन कंपनीत ‘कतार बिन लादेन ग्रुप’ची भागीदारी ५१ टक्के तर कॉपरोसाची ४९ टक्के भागीदारी असेल. या कंपनीचं म्हणजेच ‘बीसी ग्रुप’चं मुख्यालय कतारची राजधानी दोहा इथं असेल.

 

सूत्रांच्या माहितीनुसार उमर बिन लादेन दोहा मेट्रो, कतारमधले हायड्रोलिक्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटस् तसचं हायस्पीड रेल्वे योजनेचं कॉन्ट्रक्ट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मेट्रो प्रोजेक्टमध्ये कतारची राजधानी दोहा इथं लिंक स्टेडियम तसंच चार रेल्वे लाईन टाकण्याची योजना आहे. यामुळे जवळजवळ २० हजार कामगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. ‘लिक्विड नॅचरल गॅस’ निर्यात करणारा कतार हा जगातला सर्वात मोठा देश आहे. आंतराराष्ट्रीय विमानतळासाठी ११ अरब डॉलर तर ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी एक अरब डॉलर खर्च होणार असल्याचं बीसी ग्रुपनं म्हटलंय.

 

.