रशियात पुराचा तडाखा, १५० जणांचा बळी

रशियात जोरदार पाऊस झाल्याने पुराने थैमान घातले. आतापर्यंत १५०लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ अनेक जण वाहून गेलेत.या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

Updated: Jul 8, 2012, 08:21 PM IST

www.24taas.com, मॉस्को

रशियात जोरदार पाऊस झाल्याने पुराने थैमान घातले. आतापर्यंत १५०लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.  दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ अनेक जण वाहून गेलेत.या  पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

रशियाच्या मंत्रालयानुसार, मोठ्या प्रमाणावर प्रभावित क्रिम्स्क परिसरातून पोलिसांनी अत्तापर्यंत ३०० जणांना वाचवले आहे.  त्यात १५० मुलांचा सामावेश आहे. सध्या या भागात युध्दपातळीवर  मदत कार्य करण्यासाठी सहाशे पोलिस कार्यरत आहेत. क्रेसनोडर प्रांताचे गर्वनर अलेक्जेंडर तकाचयोव यांनी नऊ जुलै रोजी पुरप्रभावित लोकांसाठी  शोक दिवस पाळण्याची घोषणा केली आहे.

पुराचा धसक्का येथील लोकांनी घेतला आहे. मदत कार्य सुरू असले तरी अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. क्रेसनोडर, गेलेंडजिक आणि नोवोरोसिस्क या भागातील बरीच शहरे या पुरामुळॆ प्रभावित झाली असून, सुमारे ६० हजार लोकसंख्या असलेलल्या क्रिम्स्क परिसराला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे.

फोटो पाहा