www.24taas.com, माद्रिद
आर्थिक संकटामुळे स्पेनमध्ये दर महिन्याला सुमारे ५००० घोडे कत्तलखान्यात जातात किंवा पशूंना असेच वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील शेतकऱ्यांकडे घोड्यांना किंवा पाळीव प्राण्यांना चारा-पाणी करण्यासाठी पैसे नसल्याने घोड्यांना कत्तलखान्यात जाण्याची वेळ आली आहे.
या संदर्भात आलेल्या आकडेवारीनुसार २०१२च्या पहिल्या चार महिन्यांमध्ये सुमारे १९,७९३ घोडे कत्तलखान्यात विकले गेले. ही संख्या २०११च्या आकडेवारीच्या ३१ टक्के अधिक आहे.
तसेच कोंडवाड्यांना १६.५ कोटी सांभाळावे लागत आहे. तसेच कत्तलखान्यांमध्ये जाणाऱ्या घोड्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दोन वर्षामध्ये धष्टपुष्ट घोड्यांना कत्तलखान्यात घेऊन येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही संख्या केवळ चांगल्या घोड्यांची आहे, वृद्ध घोड्यांची संख्या वेगळी आहे.
स्पेनमध्ये घोड्याच्या मटणाची मागणी जवळपास संपली आहे. घोड्याचे मास एकतर पाळीव प्राणांना दिले जाते किंवा फ्रान्स, इटली, बेल्जियम किंवा ग्रीसला निर्यात करण्यात येते. यामुळे घोड्यांच्या पैदास केंद्रांवर अधिक परिणाम झाला आहे.