काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळ भारताचा सख्खा शेजारी. नेपाळ भारताला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन, दोन्ही देशांत नागरिक येजा करतात. मात्र शनिवारी झालेल्या भूकंपानं, हा महामार्गच उद्ध्वस्त केलाय.
नेपाळमध्ये भूकंप येऊन गेला मात्र त्याच्या परिणामांचे चटके स्थानिकांना बराच काळ सहन करावे लागणार आहेत. जिथे दिवसाला साठ - सत्तर हजारांची कमाई करणारी दुकानं, आता जेमतेम चार-पाच हजारांच्या कमाईवर आली आहेत. तर काही ठिकाणी भूकंपामुळे बेघर झालेले आणि हतबल नागरिक यांची लूट करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.