www.24taas.com, टोकियो
उत्तर जपानला आज मंगळवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे अनेकांची पळापळ झाली. पूर्वीच्या भूकंपाच्या काही आठवणी ताज्या झाल्यात. जाणवलेल्या भूकंपाचा धक्का रिश्टर स्केलवर ६.४ इतका नोंदवला गेला.
भूकंपाचा जरी तीव्र धक्का बसला असला तरी कोणत्याही हानीचे वृत्त नाही. दरम्यान, ही त्सुनामी नसल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जीवित अथवा वित्त हानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप हाती आलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्या आले आहे.
स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. ऐवाते येथे सुमारे दहा किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या पूर्वी ११ मार्च २०११ मध्ये येथे त्सनामी आली होती. त्यात सुमारे १९हजार नागरिक मृत्युमुखी आणि बेपत्ता झाले होते. त्यामुळे आज झालेल्या भूकंपामुळे भीतीचे वातावरण होते.