ओसामाला नैसर्गिक ‘व्हायग्रा’चा शौक!

कुख्यात दहशतवादी आणि अल कायदा या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या सर्वात लहान पत्नीसोबत सर्वाधिक वेळ घालवित असल्याचे समोर आले आहे.

Updated: Apr 29, 2012, 12:51 PM IST

www.24taas.com, लंडन

 

कुख्यात दहशतवादी आणि अल कायदा या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या सर्वात लहान पत्नीसोबत सर्वाधिक वेळ घालवित असल्याचे समोर आले आहे. या काळात तो केस काळे करणे आणि आपली ताकद वाढविण्यासाठी नैसर्गिक व्हायग्रा वापरत असल्याचेही उघड झाले आहे.

 

‘द डेली मेल’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ओसामा आपल्या तीन पत्नीसह पाकिस्तानात वास्तव्यास होता. यात त्याची २६ वर्षांची सर्वात छोट्या पत्नीचाही समावेश होता. ओसामाने टाइम मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मला समजत नाही, की लोकं एका पत्नीबरोबरच का राहतात. तुम्ही जर चार पत्नी ठेवल्यात तर तुम्ही एका नवऱ्यासारखे जीवन जगू शकतात.

 

गेल्या वर्षी मे महिन्यात ओसामा बिन लादेला पाकिस्तानच्या ऐबटाबाद येथे अमेरिकेच्या सैनिकांनी ठार मारले होते.  अमेरिकी सैन्याने ओसामा ठार झाल्यानंतर त्या ठिकाणाहून अनेक वस्तू ताब्यात घेतल्या. त्यावेळी अवेना नामक कामोत्तेजक सिरपही त्यांना सापडले होते. तसेच ओसामाच्या बाथरूमध्ये ‘जस्ट फॉर मेन’ नामक हेअर डायही सापडला.

 

ओसामा आपल्या तरुणी पत्नीसह तिसऱ्या मजल्यावर राहत होता. ओसामाने २००० मध्ये अमालशी लग्न केले होते. अमालपासून त्याला पाच मुलं होती.

Tags: