'दहशतवादी माझे फॅन असू शकतात, मी दोषी नाही'

मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईकनं एका नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यानं भारतीय मीडियाला आव्हान दिलं आहे.

Updated: Jul 8, 2016, 10:16 PM IST
'दहशतवादी माझे फॅन असू शकतात, मी दोषी नाही' title=

मुंबई : मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईकनं एका नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यानं भारतीय मीडियाला आव्हान दिलं आहे. एवढच नाही तर त्यानं बांग्लादेशनं तिथल्या दहशतवादी हल्ल्याला मला दोषी मानलं नाही, असंही तो म्हणाला आहे. 

भारतीय मीडियाला बांग्लादेशबरोबर सत्याची पडताळणी करायला हवी. मीडियाला मी आव्हान देतो की त्यांनी बांग्लादेश सरकारचं अधिकृत वक्तव्य समोर ठेवावं. माझं बांग्लादेशमधल्या सरकारी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. त्या दहशतवाद्यांनी माझ्या भाषणातून प्रेरणा घेऊन हल्ला केला नाही, असं मला अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं झाकीर नाईक म्हणाला आहे. 

ते दहशतवादी माझे फॅन असतील, पण यातून हे सिद्ध होत नाही की मी त्यांना निर्दोष लोकांची हत्या करायला प्रेरित केलं, अशी प्रतिक्रिया नाईकनं दिली आहे.