नवी दिल्ली : लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला आता गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 साली लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकवेळी रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला सिल्व्हर मेडल तर तोघरूल असगारोव्हला गोल्ड मेडल मिळालं होतं.
गोल्ड आणि सिल्व्हर मेडल मिळालेले हे दोन्ही खेळाडू डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानं आता योगेश्वर दत्तला गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या आधीच्या लंडन ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या सॅम्पलची आयओसीकडून पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. हे सॅम्पल 10 वर्षांपर्यंत ठेवले जातात.