'पुरुष महिलांना आरक्षण नाकारतात, कारण...'

'विमेन ऑफ वर्थ कॉन्क्लेव्ह'चं आज उद्घाटन करण्यात आलं. 

Updated: Mar 8, 2016, 04:34 PM IST
'पुरुष महिलांना आरक्षण नाकारतात, कारण...' title=

नवी दिल्ली : 'विमेन ऑफ वर्थ कॉन्क्लेव्ह'चं आज उद्घाटन करण्यात आलं. 

यावेळी, उद्घाटन सत्राला संबोधित करताना एका न्यूज चॅनेल समूहाचे कार्यकारी सह-अध्यक्ष डॉ. प्रणव रॉय यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

भारताच्या महिला पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं स्वत:ला सिद्ध करू शकतात, आणि याच गोष्टीला भारतातले पुरुष राजनेते घाबरतात... त्यामुळेच, ते महिलांच्या आरक्षणाला विरोध करतात, असं डॉ. प्रणव रॉय यांनी म्हटलंय. 

पुरुषांनी महिलांनी दिलेला सल्ला सहजगत्या घेण्याची आणि तो मानण्याची वेळ आलीय... महिला मागे राहण्याचं एकमेव कारण हेच आहे की पुरुष त्यांच्या क्षमतांना घाबरतात, असंही ते म्हणालेत. 

रॉय यांच्या याच भूमिकेची 'री विमेन ऑफ वर्थ पुरस्कार सोहळ्याची आहे, असं म्हणत लोरियाल इंडियाचे अधिकारी क्रिस्टॉफे लेटेलियर यांनीही राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देण्याची मागणी केलीय.