अनैतिक संबंध ठेवण्यास मनाई केल्याने पतीची हत्या

झज्जर येथे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासली जाणारी घटना घडली आहे. येथे एका पत्नीने अनैतिक संबंधांसाठी स्वत:च्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीचं धड आणि मुंडकं वेगळं केलं आणि घरातचं त्याला जमिनीखाली गाडलं.

Updated: Apr 27, 2016, 05:10 PM IST
अनैतिक संबंध ठेवण्यास मनाई केल्याने पतीची हत्या title=

हरियाणा : झज्जर येथे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासली जाणारी घटना घडली आहे. येथे एका पत्नीने अनैतिक संबंधांसाठी स्वत:च्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीचं धड आणि मुंडकं वेगळं केलं आणि घरातचं त्याला जमिनीखाली गाडलं.

पूजा नामक या महिलेचा हा गुन्हा जगासमोर नसता आला जर तिचा पती बलजीतने त्याच्या भावाला एक गुपीत नसतं सांगितलं. बलजीतने भावाला सांगितलं होतं की त्याच्या पत्नीचे अनेकांशी अनैतिक संबंध आहे. आणि जेव्हा त्याने याबाबत तिला रोखलं तेव्हा ती त्याला मारण्याची धमकी देत होती. बलजीतने याबाबत त्याच्या परिवाराला सांगितलं होतं. 

२ दिवस बलजीत न दिसल्याने आणि ऑफिसमध्ये ही न आल्याने अनेकांना संशय आला. त्याचे नातेवाईक जेव्हा घरी पोहोचले तेव्हा पूजाने दार उघडलं नाही. ज्यामुळे संशय आणखी वाढला. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि पोलीस जेव्हा दरवाजा उघडून आत गेले तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. पोलिसांना संशय आहे की या हत्येमागे पूजासोबत आणखी कोणीतरी आहे. याचा पोलीस शोध घेतायंत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x