सासू सासऱ्याला वश करण्यासाठी चहामध्ये टाकत होती मूत्र

 इंदूर जिल्हा न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इंदूरच्या राधिका नगर येथे राहणाऱ्या सूरज नागवंशी यांनी सून नेहा नागवंशीच्या त्रासाला कंटाळून कोर्टाची पायरी चढली आहे. कोर्टाने सासूचे म्हणणे ऐकून सूनेविरोधात समन्स जारी केला आहे. 

Updated: Apr 3, 2015, 06:13 PM IST
सासू सासऱ्याला वश करण्यासाठी चहामध्ये टाकत होती मूत्र title=

इंदूर :  इंदूर जिल्हा न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इंदूरच्या राधिका नगर येथे राहणाऱ्या सूरज नागवंशी यांनी सून नेहा नागवंशीच्या त्रासाला कंटाळून कोर्टाची पायरी चढली आहे. कोर्टाने सासूचे म्हणणे ऐकून सूनेविरोधात समन्स जारी केला आहे. 

काय आहे प्रकरण 
नेहाला आपल्या सासरी राहण्याची इच्छा नव्हती. ती आपल्या माहेरी गेली होती. तिच्या पतीने हातपाय पडून तिला पुन्हा सासरी आणले. आपल्या अंगात देवी येते असे सांगून आपल्या पतीकडून सेवा करून घेण्यास सुरूवात केली. नेहा आपल्या पतीकडून पाय दाबून घेत होती, जेवण तयार करायला लावत होती. साफसफाई आणि भांडी घासायला सांगत होती. 

सासू-सासऱ्यांना याचा विरोध केला तेव्हा त्यांना आपल्या वशमध्ये करण्यासाठी तिने काही विचित्र प्रकार करायला सुरूवात केली. हे ऐकून ते देखील हैराण झाले. नेहा सासू-सासऱ्यांना वर वशीकरणचा प्रयोग करत होती. त्यांच्या चहामध्ये आपली लघवी मिसळून त्यांना पाजत होती. एकदा तिच्या सासूने असे करताना तिला पकडले. जेव्हा रागविल्यावर तीने खरे उघड केले. 

घबरलेल्या सासूने पोलिस ठाण्यात आणि नंतर कोर्टात शरण घेतली. सूनेच्या या विचित्र प्रकारचा खालसा झाल्यावर सासून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या ठिकाणी काही कारवाई झाली नाही म्हणू त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 

या प्रकरणाची माहिती सुनेचा भावाला मिळाल्यावर त्याने पोलिसात असल्याने उलट सासू-सासऱ्यांना धमकावले आणि आपल्या बहिणीला तो घरी घेऊ गेला. 

कोर्टही झाले हैराण 
कोर्टात अशा प्रकारचे हे पहिले प्रकरण आहे. कोर्टासमोर तक्रारकर्त्यांच्या वकीलांनी सर्व प्रकरण मांडले तर न्यायाधिशही हैराण झाले. अखेर त्यांनी महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.