ऑर्डर केलं चिली पनीर, पण आला कंडोम

ऑनलाईन चिली पनीर ऑर्डर केल्यानंतर त्याबरोबर कंडोम आल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या जमशेदपूरमध्ये घडली आहे. 

Updated: Apr 17, 2016, 08:11 PM IST
ऑर्डर केलं चिली पनीर, पण आला कंडोम title=

जमशेदपूर: ऑनलाईन चिली पनीर ऑर्डर केल्यानंतर त्याबरोबर कंडोम आल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या जमशेदपूरमध्ये घडली आहे. 

जमशेदपूरमध्ये टाटा स्टील या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेनं ग्रेव्हीकार्ट डॉट कॉम या वेबसाईटवर चिली पनीर ऑर्डर केलं, त्यानंतर आलेल्या पनीर चिलीचा डबा बघून आपल्याला धक्का बसला कारण या पार्सलमध्ये कंडोमही होता, अशी प्रतिक्रिया या महिलेनं दिली आहे. 

हा कंडोम मी डिलिव्हरी बॉयला परत घ्यायला सांगितला, पण त्यानं तो घ्यायला नकार दिला, असा आरोपही या महिलेनं केला आहे. दरम्यान हॉटेल मालकानं मात्र महिलेने केलेले हे आरोप फेटाळले आहेत. खायच्या पार्सलमध्ये कंडोम सापडण्यामागे षडयंत्र असल्याचं हॉटेलचं म्हणणं आहे. तसंच हॉटेलनं या डिलिव्हरी बॉयला नोकरीवरूनही काढून टाकलं आहे.