जर देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल असते, तर...- मोदी

“सरदार पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर आज देशाचं चित्र वेगळं असतं”, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समक्ष म्हटले. देशाचे पहिले गृहमंत्री तसंच स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित वस्तु संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्यात नरेंद्र मोदी असं म्हणाले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 29, 2013, 08:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
“सरदार पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर आज देशाचं चित्र वेगळं असतं”, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समक्ष म्हटले. देशाचे पहिले गृहमंत्री तसंच स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित वस्तु संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्यात नरेंद्र मोदी असं म्हणाले.
याबरोबरच हिंसेची संस्कृती सोडून देशाच्या एकात्मतेवर भर देण्याचं आवाहन मोदी यांनी आपल्या भाषणात केलं. “जर देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल असते तर... पटेलांकडे दूरदृष्टी होती. १९१९मध्ये जेव्हा ते गुजरातमध्ये सभासद होते, तेव्हा त्यांनी महिला आरक्षण विधेयक पारित करण्याचा विचार केला होता. पटेलंनी देशाच्या एकात्मतेसाठी कार्य केलं आणि आपल्यासाठी समृद्ध वारसा दिला. दुर्दैवाने आज आतंकवाद असो किंवा माओवाद यांतून देश तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या गोष्टींचा कधीच विजय होणार नाही. गांधी आणि पटेलांच्या देशात बॉम्ब आणि बंदुका कधीच जिंकणार नाहीत.” असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज चक्क एका व्यासपीठावर आले. अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. सरदार वल्लभभाई पटेल मेमोरियल सोसायटीच्या वतीनं हे म्युझियम उभारण्यात आलंय.
आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारकडून गुजरात सरकारला शिस्तबद्ध प्रशासनाबद्दल वेळोवेळी मिळालेल्या गौरवाची पंतप्रधानांना आठवण करून देत त्यांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्री दिनशा पटेल हे सोसायटीचे अध्यक्ष असून, त्यांनीच दोन दिवसांपूर्वी मोदींना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.