व्हिडिओ : तुम्ही बलात्कार पीडितेशी लग्न करणार?

नवी दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला... यामुळे, जनतेतल्या काही जणांचा दबलेला आवाज उसळत बाहेर आला... आणि देशानं हा आवाज उचलून धरला.

Updated: Aug 5, 2014, 09:43 AM IST
व्हिडिओ : तुम्ही बलात्कार पीडितेशी लग्न करणार? title=

मुंबई : नवी दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला... यामुळे, जनतेतल्या काही जणांचा दबलेला आवाज उसळत बाहेर आला... आणि देशानं हा आवाज उचलून धरला.

पण, सोशल मीडियावर केवळ टीव टीव करणाऱ्या जनतेवर अशा एखाद्या प्रसंगाला स्वत:ला तोंड द्यावं लागलं तर... हाच प्रश्न घेऊन काही तरुण पोहचले जनतेत...

‘तुम्ही बलात्कार पीडितेशी लग्न करणार का?’ असा प्रश्न त्यांनी याच जनतेसमोर ठेवला... फेसबूक-ट्विटरवर आपली बहादूरता शेअर करणाऱ्या आणि राग आला की मेणबत्त्या हातात घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या या जनतेची उत्तरं जनतेची खरी मानसिकता दाखवण्यासाठी पुरेशी ठरतात.

बलात्कार पीडितेबद्दल लोकांना काय वाटतं? अशा मुलींसाठी आपण रस्त्यावर उतरायला तयार असतो पण, याच मुलींना आपण स्वत: स्वीकार करू शकतो का? याच प्रश्नांची ही काही उत्तरं...   

या व्हिडिओमध्ये ही उत्तरं तुम्हाला ऐकायला मिळतील... सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार शेअर होतोय...

व्हिडिओ पाहा - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.