रविवारचा दिवस मोदींसाठी `लकी` ठरणार?

भाजपच्या गोव्यात सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत पहिल्या दिवशी चर्चा होती ती नरेंद्र मोदींच्या नावाचीच...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 8, 2013, 10:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गोवा
भाजपच्या गोव्यात सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत पहिल्या दिवशी चर्चा होती ती नरेंद्र मोदींच्या नावाचीच... या बैठकीत मोदींकडे २०१४च्या निवडणूक प्रचाराची धुरा सोपवली जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर मोदी समर्थकांमध्ये उत्साहाचं वातारवण आहे. रविवारी होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
भाजपच्या नेते खासगीत याबाबत सांगत असले, तरी अधिकृतरित्या बोलायला कोणीही तयार नाही. मात्र, पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. महासचिव थावरचंद गेहलोत यांनी महासभेमधघ्ये मोदींचं जाहीर समर्थन केल्याची चर्चा आहे तर माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि मोदी यांच्यात सुमारे ५० मिनिटं बैठक झाली. राजनाथ सिंग यांनी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या घडामोडींमुळे भाजपमध्ये मोदींचं स्थान आणखी वाढणार असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे. रविवारी कार्यकर्ते इथून नवा उत्साह घेऊन जातील, असं सांगत पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर यांनीही याबाबत संकेत दिलेत.

भाजपातील मोदी आणि अडवाणी प्रकरणाबाबत शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. गोव्यातील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकरणीमधील नाट्यावर शिवसेना तटस्थपणे बघत असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ह्यांनी स्पष्ट केलंय. मोदी आणि अडवाणी ह्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमातील बातम्यांवरुन शिवसेना प्रतिक्रिया देणार नसल्याचं राऊत यांनी सांगितलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.