नवी दिल्ली : भारतीय जनता युवा मोर्चाचे अलिगडमधले एक नेता वादात अडकलेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुस्लिमांचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करून त्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 11 लाखांचं इनाम देणार असल्याचं विधान योगेश वर्ष्णेय यांनी केलंय.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये याचे पडसाद उमटले. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करत वर्ष्णेय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या विधानाचा सर्वच विरोधी पक्षांसह सरकारी बाजूकडूनही निषेध करण्यात आला.