रेल्वेचं बजेट वेगळं का ?

प्रत्येक वर्षी रेल्वेचं बजेट आणि जनरल बजेट हे वेगळं सादर केलं जातं. जनरल बजेटमधून रेल्वे बजेट का वेगळं करण्यात आलं

Updated: Feb 25, 2016, 01:39 PM IST
रेल्वेचं बजेट वेगळं का ? title=

रामराजे शिंदे, प्रतिनिधी (नवी दिल्ली) : प्रत्येक वर्षी रेल्वेचं बजेट आणि जनरल बजेट हे वेगळं सादर केलं जातं. जनरल बजेटमधून रेल्वे बजेट का वेगळं करण्यात आलं याची सुरुवात कधी झाली यामागेही एक इतिहास आहे.

रेल्वेचं बजेट वेगळं का ?

1921 मध्ये ब्रिटीश रेल्वे अर्थशास्त्रज्ञ विलिमय एक्वर्थ यांना भारतीय रेल्वे कमिटीचं चेअरमन बनवण्यात आलं. त्यानंतर एक्वर्थ यांना वाटलं की, भारतीय रेल्वे मध्ये चांगल्या व्यवस्थापनाची गरज आहे. या समितीनं रेल्वेच्या समस्या, लोकांच्या अपेक्षा यांचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला. 

त्या अहवालाला एक्वर्थ अहवाल असं नाव देण्यात आलं. या अहवालात रेल्वेच्या पुर्नबांधणी संदर्भात काही सूचना देण्यात आल्या होत्या.

जनरल बजेटमध्ये रेल्वेची भागीदारी ७० टक्के होती. जनरल बजेटमध्ये रेल्वेची मोठी भागीदारी असल्यामुळेच रेल्वेचाच वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची सूचना पुढे आली.

भारतीय रेल्वेची वैशिष्ट्ये

- याच सूचनांना लक्षात घेऊन १९२४ मध्ये रेल्वे अर्थसंकल्प वेगळा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  इंग्रजांनी सुरू केलेली ही प्रथा आजसुद्धा पाळली जाते. त्यामुळेच देशाच्या अर्थसंकल्पाआगोदर रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जातो. 

- रेल्वे अर्थसंकल्प वेगळा केल्यानंतर प्रवासी वाहतूक ७५ टक्के तर मालवाहतूकीसाठी ९० टक्के रेल्वेचा वापर करण्यात आला.

- भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली. 

- या १४ बोगी रेल्वेला ३ इंजिन ओढत होते. त्यांची नावे सुल्तान, सिंध आणि साहिब ठेवण्यात आली होती.

- भारतात पहिला रेल्वे रूळ दोन भारतीयांनी बसवला होता. जगन्नाथ शंकरशेठ आणि जमशेदजी अशी त्यांची नावे. सुरूवातीला ५० वर्षापर्यंत रेल्वेमध्ये शौचालय नव्हते. 

- १९०९ मध्ये ओखिल चंद्र सेन याने प्रवास करताना त्यांचे अनुभव साहिबगंज रेल्वे विभागाच्या कार्यालयाला कळवले. त्यानंतर ब्रिटीश सरकारने शौचालय बनवले. 

- कॉम्प्युटरने आरक्षण करण्याची सेवा सर्वप्रथम दिल्लीत १९८६ मध्ये सुरू झाली.