कॅप्टन जॅक स्पॅरो का चालवतो दिल्लीच्या रस्त्यावर रिक्षा?

विराट कोहलीचा पाकिस्तानातील 'हमशकल'ने इंटरनेटवर धुमाकूळ माजवल्यानंतर 'पायरेट्स ऑफ कॅरिबीयन'मधील कॅप्टन जॅक स्पॅरो दिल्लीच्या रस्त्यावर सायकल रिक्षा ओढत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. 

Updated: Jul 24, 2015, 08:36 PM IST
कॅप्टन जॅक स्पॅरो का चालवतो दिल्लीच्या रस्त्यावर रिक्षा?  title=

नवी दिल्ली : विराट कोहलीचा पाकिस्तानातील 'हमशकल'ने इंटरनेटवर धुमाकूळ माजवल्यानंतर 'पायरेट्स ऑफ कॅरिबीयन'मधील कॅप्टन जॅक स्पॅरो दिल्लीच्या रस्त्यावर सायकल रिक्षा ओढत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. 

मिनल अरोरा या दिल्लीकर तरूणीने जॅक स्पॅरो सारखा दिसणारा रिक्षावाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि आपल्या टाइमलाइनवर शेअर केला. 

अभिनेता जॉनी डेप याने 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' मध्ये कॅप्टन जॅक स्पॅरोचा रोल केला होता. ही सहाय्यक अभिनेत्याची भूमिका असली तरी ती खूप गाजली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.