करीनाच्या प्रेमात मुख्यमंत्री रमण सिंग

सध्या सेल्फीचा जमाना आहे. युवा पिढीबरोबर हल्ली नेते लोकांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र हा सेल्फीचा नाद मुख्यमंत्री रमण सिंग याच्यासाठी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

Updated: Nov 21, 2015, 11:12 AM IST
करीनाच्या प्रेमात मुख्यमंत्री रमण सिंग title=

रायपूर : सध्या स्मार्टफोनमुळे सेल्फीचा जमाना आहे. युवा पिढीबरोबर हल्ली राजकीय नेते लोकांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र हा सेल्फीचा नाद मुख्यमंत्री रमण सिंग याच्यासाठी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

छत्तीगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये मातृशक्तीवर आयोजित युनिसेफच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री रमण सिंग यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरही उपस्थित होती. बॉलिवूड अभिनेत्री शेजारी बसलेली असताना सेल्फी काढण्याचा मोह काही रमण सिंग यांना आवरता आला नाही. त्यामुळे त्यांनी लगेचच स्मार्टफोन काढला आणि करीनासह सेल्फी क्लिक केला.

मात्र रमण यांच्या सेल्फी क्लिकवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि मुख्यमंत्री कलाकारांसह सेल्फी काढण्यात मग्न आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. दरम्यान, याप्रकरणी राज्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सवाल केला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. 'मुख्यमंत्री जेथे जेथे कार्यक्रमाला जातात तेथे उपस्थित नागरिकांचे फोटो घेतात आणि या कार्यक्रमातही ते करीनासोबत सेल्फी न घेता उपस्थित मुलांचे फोटो घेत होते', अशी सारवासारव या पदाधिकाऱ्यांने केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.