500, 1000 च्या जुन्या नोटांचं काय करणार ? जाणून घ्या

8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता 500 आणि 1000 च्या नव्या नोटा मिळणं सुरु झालं आहे. एटीएममध्ये ही उद्यापासून नव्या नोटा मिळणे शक्य होणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता या जुन्या नोटांचं काय होणार ? 

Updated: Nov 10, 2016, 05:54 PM IST
500, 1000 च्या जुन्या नोटांचं काय करणार ? जाणून घ्या title=

मुंबई : 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता 500 आणि 1000 च्या नव्या नोटा मिळणं सुरु झालं आहे. एटीएममध्ये ही उद्यापासून नव्या नोटा मिळणे शक्य होणार आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता या जुन्या नोटांचं काय होणार ? 

काही लोकं या निर्णयावर नाराज आहेत. 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांचं आता होणार काय ? इतक्या नोटांचं काय करणार ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याचं उत्तर असं की, आता रिझर्व्ह बँकेने यावर कात्री चालवण्यास सुरुवात केली आहे. छोट्या- छोट्या तुकड्य़ांमध्ये 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा कापल्या जाणार आहे. पण त्या वाया जाणार नाहीत. त्याचा पुन्हा वापर होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे आणि त्याची तयारी देखील झाली आहे.

कशा प्रकारे होणार पुन्हा वापर ? 

या जुन्या नोटा कापल्या नंतर पुन्हा त्यापासून पुन्हा नव्या नोटा तयार करण्यात येऊ नये म्हणून त्या एका कंडिशनरमध्ये टाकून त्याला भिजवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्याचा कोळसा तयार केला जाणार असून इंधनाच्या रुपात त्याचा वापर होणार आहे. मार्च 2016 पर्यंत 500 चे 1570 कोटी आणि 7 लाख नोटा तर एक हजाराचे 632 कोटी आणि 6 लाख नोटा व्यवहारात आहे.

दुसऱ्या देशांमध्ये जुन्या नोटांचं काय केलं ?

जगभरात याआधी देखीस नोटा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी नोटा जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. बँक ऑफ इंग्लंडने 1990 पर्यंत असंच केलं. 2000 नंतर बँकेने कम्पोस्टिंग ट्रीटमेंटने नोटांना रिसायकल करुन माताची दर्जा वाढवण्यासाठी वापर करण्यात येऊ लागला.

अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्ह बँकेने नोटांना छोट्या छोट्या तुकड्यात कापून त्याचा वापर कला किंवा कमर्शियल रूपात केला.

पॅब्लो एस्कोबार हा एक अमेरिकेचा ड्रग्स व्यापारी होता. त्याने आपल्या मुलीला थंडी पासून वाचवण्यासाठी एक मिलियन डॉलर जाळून टाकले होते. 
हंगरी सेंट्रल बँकेने 2012 मध्ये ठंडीपासून काही लोकांना वाचवण्यासाठी नोटा जाळल्या होत्या.