नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता देशाला संबोधित करणार आहेत. नोटबंदीच्या निर्णयाला यशस्वी बनवण्यासाठी भाजप सोबतच सरकारी यंत्रणा प्रयत्न करत होती. नोटबंदी यशस्वी कशी झाली याचबरोबर नोटबंदीनंतर भविष्यात देशाचा रोडमॅप कसा असेल यावर मोदींचं भाषण होईल.
पंतप्रधानांच्या या भाषणामध्ये शेतकरी, कामगार, बेरोजगार आणि डिजिटल पेमेंट करणारे व्यापारी यांच्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. नवीन नोटांची उपलब्धता, पैसे काढण्याची मर्यादा, उद्योगांची स्थिती, अर्थव्यवस्थेची विद्यमान आणि भविष्यातील दिशा यावर नरेंद्र मोदी उत्तर देतील गावपातळीवर आणि शहरात चाललेल्या प्रत्येक हालचालीची माहिती सरकारकडे उपलब्ध आहे.
१. नोटबंदी हा मुख्य विषय असेल
- नोटबंदी नंतर ५०० आणि हजारच्या नोटा किती आल्या
- काळा पैसा किती जमा झाला याची आकडेवारी
- बॅक आणि बॅक अधिका-यांवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यात येईल
२. गरीब कल्याण योजनाद्वारे महत्त्वाची घोषणा होऊ शकते
- त्यातून शेतकरी, कामगार आणि गरीबांसाठी महत्त्वाची घोषणा
- नोटबंदी नंतर आलेल्या पैशातून शेतकरी, गरीबांसाठी महत्त्वाची योजना आणली जाईल
- दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी पेन्शन आणि बेरोजगारांसाठी भत्ता देण्याची घोषणा होऊ शकते.
३. डिजिटल पेमेंट करणा-यासाठी महत्त्वाची घोषणा होऊ शकते.
- आधार लिंकद्वारे देवाण घेवाण करणा-या व्यापा-यांच्या प्रत्येक व्यवहारावर १० रूपयांची सूट मिळू शकते.
३. बेनामी संपत्तीवर सरकारतर्फे टाच आणली जाणार आहे. बेनामी संपत्तीवर कशाप्रकारे हल्ला केला जाईल याची माहिती.
४. राजकीय मुद्दे
- नोटबंदीचा फायदा झाला नसल्याचा आरोप विरोधी करत आहेत. त्यावर प्रत्युत्तर.
- सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा काढला जाईल.
- जीएसटी पुढील वर्षी लागू केला जाणार आहे, त्यासंदर्भात पंतप्रधान बोलतील.