लव्ह जिहाद हे काय आहे? - राजनाथ सिंग

काही भाजपचे नेते यांनी लव्ह जिहादचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करीत असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी, हे काय असते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे दाखवून दिले आहे.

Updated: Sep 12, 2014, 07:32 PM IST
लव्ह जिहाद हे काय आहे? - राजनाथ सिंग title=

नवी दिल्ली : काही भाजपचे नेते यांनी लव्ह जिहादचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करीत असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी, हे काय असते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे दाखवून दिले आहे.

लव्ह जिहादबाबत राजनाथ सिंग हसून प्रश्न विचारला, लव्ह जिहाद हे काय आहे?, उत्तर प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी लक्ष्मीकांत वाजपेयी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता.

मुस्लीम तरुणांपासून हिंदू मुलींनी दूर राहण्याचा सल्ला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यातील काही नेत्यांनी दिला होता. त्यांच्या विधानाबाबत राजनाथ सिंग यांना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणालेत, अरे, हे काय असतं? मला नाही माहीत. याबाबत पुन्हा विचारल्यानंतर म्हणालेत, मला याबाबत काही माहिती नाही, असे त्यांनी उत्तर दिले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.