पेशंटवर रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यांनी केला बलात्कार

मेवाड येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णलयातील एका २२ वर्षीय पेशंटवर एका वार्डबॉयने आणि सेक्युरीटी गार्डने बलात्कार केला. ही तरुणी मानसिक रुग्ण आहे. 

Updated: Jun 8, 2016, 05:45 PM IST
पेशंटवर रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यांनी केला बलात्कार title=

गुडगाव : मेवाड येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णलयातील एका २२ वर्षीय पेशंटवर एका वार्डबॉयने आणि सेक्युरीटी गार्डने बलात्कार केला. ही तरुणी मानसिक रुग्ण आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास २ तास दोन्ही आरोपींनी या तरुणीवर एका रुममध्ये बलात्कार केला. या तरुणीची बहिण आणि तिचे पती जेव्हा तरुणीला बघायला आले तेव्हा ती तिच्या बेडवर नव्हती. त्यानंतर त्यांनी आरडा ओरड केली आणि त्यानंतर दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी वार्डबॉयला अटक केली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का याची पोलीस चौकशी करत आहे आणि मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई होणार आहे. दोघांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.