दाऊदचा सहकारी अतिरेकी अब्दुल टुंडाला अटक

भारत-नेपाळ सीमेवर दाऊदचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा (७०) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वृत्ताला पोलिसांचा हवाला देऊन पीटीआयने दुजोरा दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2013, 11:11 AM IST

www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
भारत-नेपाळ सीमेवर दाऊदचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा (७०) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. अटकेच्या वृत्ताला पोलिसांचा हवाला देऊन पीटीआयने दुजोरा दिलाय. टुंडा बॉम्ब तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो.
कुख्यात दहशहतवादी अब्दुल करीम टुंडाच्या दिल्ली पोलीसांच्या विषेश पथकानं मुसक्या आवळल्यात. टुंडा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि दहशतदावी हाफीस सईदचा जवळचा साथीदार आहे.
मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली सह देशभरात घडवून आणलेल्या ४० स्फोटांमागे टुंडाचा हात आहे. पाकिस्तानला सोपवलेल्या दहशवाद्यांच्या यादीत टुंडाचा १५वा नंबरलागतो. मुंबई ट्रेन ब्लास्टमध्येही आणि २६/११ हल्यांसाठी तो मुंबई पोलीसांना हवा आहे.
अब्दुल करीम टुंडा हा भारतात घातपात घडविण्यासाठी सक्रिय होता. भारतात पुन्हा अतिरेकी हल्ले करण्यात येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर टुंडा याला अटक करण्यात आल्याने अतिरेक्यांचा कट उधळला गेलाय. टुंडा याला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
आंतरराष्ट्रीय अतिरेकी अब्दुल करीम टुंडा हा २१ दशहवादी प्रकणात आरोपी आहे. टुंडा हा बॉम्ब तयार करण्यात माहीर आहे. त्यात तो तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. टुंडा हा लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य आहे. लष्कर ए तय्यबाकडून भारतात अतिरेकी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. टुंडा याला अटक करण्यात आल्याने लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनेचा कट उधळला गेला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.