विजय माल्ल्याची बँकांना नवी ऑफर

17 बँकांचं तब्बल 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्यानं बँकांना नवा प्रस्ताव दिला आहे. 

Updated: Apr 22, 2016, 10:17 PM IST
विजय माल्ल्याची बँकांना नवी ऑफर title=

मुंबई: 17 बँकांचं तब्बल 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेल्या विजय माल्ल्यानं बँकांना नवा प्रस्ताव दिला आहे. मी या बँकांना 6868 कोटी रुपये द्यायला तयार आहे, असं माल्ल्या म्हणाला आहे. माल्ल्याची ही ऑफर बँका स्विकारतात का हे पाहावं लागणार आहे. 

याआधी माल्ल्यानं 4,400 कोटी रुपये द्यायला तयार असल्याचं म्हंटलं होतं, पण बँकांनी हा प्रस्ताव अमान्य केला होता. 

विजय माल्ल्याचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला आहे, तसंचं त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंटही बजावण्यात आला आहे, त्यामुळे माल्ल्यानं ही सावध भूमिका घेत माल्ल्यानं ही नवी ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.