विजय दिवस : तिन्ही संरक्षण दल प्रमुखांची शहिदांना आदरांजली

विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी अमर जवान ज्योती इथं शहिदांना आदरांजली वाहिली. 

PTI | Updated: Dec 16, 2016, 11:39 PM IST
विजय दिवस : तिन्ही संरक्षण दल प्रमुखांची शहिदांना आदरांजली title=

नवी दिल्ली : विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी अमर जवान ज्योती इथं शहिदांना आदरांजली वाहिली. 

16 डिसेंबर 1971 रोजी भारताने युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती. याच दिवशी ढाक्यात  पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व करणा-या ले. जनरल ए.के. नियाजी यांच्यासमोर तब्बल 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण करुन पराभव मान्य केला होता. या युद्धात 12 दिवसात अनेक भारतीय जवान शहिद झाले होते आणि कित्येक जखमी झाले होते.

या युद्धात भारतीय सैन्याचं नेतृत्व सॅम मानेकशॉ यांनी केलं होतं. या युद्धानंतरच बांग्लादेशचा जगाच्या नकाशावर उदय झाला होता. हाच ऐतिहासिक दिवस आणि शहिद जवानांची आठवण म्हणून दरवर्षी 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा करण्यात येतो. 

हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिल. बांग्लादेशची मुक्ती हा भारताचा पराक्रम असल्याचंही ते म्हणालेत.