'गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही'

गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही असे वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केले आहे. रावत यांच्या या विधानाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 20, 2015, 04:36 PM IST
'गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही' title=

डेहराडून : गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केले आहे. रावत यांच्या या विधानाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गोपाष्टमीच्या निमित्ताने डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'गाईची हत्या करणाऱ्या व्यक्ती देशाचे शत्रू आहेत आणि त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही', असे रावत कार्यक्रमादरम्यान म्हणाले. तसेच उत्तराखंडमध्ये गोहत्या करणाऱ्यांना कडक शासन केले जाईल. त्याचप्रमाणे गोहत्येच्या रक्षणसाठी वाटेल ते करु असेही रावत यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, रावत यांच्या आक्षेपार्ह विधानावर टीका सुरु झाल्यानंतर आपण असे विधान केलेच नसल्याचा दावा आता हरीश रावत करत आहेत. मी कार्यक्रमात सहभागी झालो होतो. मात्र असे काही विधान केले नाही असे रावत यांचे म्हणणे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.