नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे दिल्लीमधली गणितं बदलणार आहेत. उत्तर प्रदेशमधल्या या विजयामुळे भाजपला जुलैमध्ये होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणखी सोपी होणार आहे. याचबरोबर राज्यसभेमध्येही भाजपला विधेयकं मंजूर करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण १०,९८,८८२ मतं आहेत. यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी जवळपास ५.४९ लाख मतांची गरज लागते. भाजपकडे सध्या ४ लाख ५७ हजार मतं आहेत, म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठी आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी ९२ हजार मतांची गरज होती. आता निकाल लागलेल्या पाच राज्यांपैकी फक्त उत्तर प्रदेशमधून ८३,८२४ मतं आहेत. याचा भाजपला नक्कीच फायदा होईल.
याबरोबरच २०१८ साली राज्य सभेतील उत्तर प्रदेशमधून १० खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामुळेही भाजपला मोठा फायदा होणार आहे.