यूपीत पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय.

Updated: Feb 11, 2017, 08:00 AM IST
यूपीत पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालीय.

15 जिल्ह्यातील 73 जागांसाठी हे मतदान होतंय. या निवडणुकीत 839 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. या टप्प्यात 2,60,17,128 मतदार आपल्या अधिकाराचा वापर करणार आहेत.

मुस्लिम बहुल आणि जाट लँड म्हणून ओळख असलेल्या या भागात कोणता पक्ष बाजी मारेल, याचं भवितव्य ठरणार आहे. राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांची नोएडा मतदारसंघातून प्रतिष्ठा पणाला लागलीय. अलिगडमधून माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे नातू संदीप सिंग तर सरधानामधून संगीत सोम यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

अखिलेश यादव यादव याचे निकटवर्तीय अतुल चौहान आणि बसपाचे हाफिज याकूब यांचं संगीत सोम यांना आव्हान असणार आहे. तर लालूप्रसाद यादव यांचे जावई राहुल यादव समाजवादी पक्षाकडून गौतम बुद्धनगरमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत.