अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री

महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीय. राज्य सरकारनं दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या आधारावर त्यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली. 

Updated: Apr 20, 2015, 11:02 PM IST
अवकाळी पावसामुळं राज्यात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - केंद्रीय कृषिमंत्री title=

नवी दिल्ली: महाराष्ट्रात अवकाळी पावसानंतर केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलीय. राज्य सरकारनं दिलेल्या धक्कादायक अहवालाच्या आधारावर त्यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत विद्यमान महाराष्ट्रातील भाजप सरकार दिशाभूल करणारी आकडेवारी देत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. यापूर्वी २०११-१२ आणि २०१२-१३ या वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर झाल्याचं कृषिमंत्र्यांनी सांगितलं. यावर काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती चुकीची असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. 

दुष्काळ आणि अवकाळी पावसाची मदत देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारनं आता आत्महत्यांच्या मुद्यावरही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू केल्याचं दिसतंय. गेल्या साडे तीन महिन्यात राज्यात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना सरकारनं नेमक्या कोणाच्या आधारावर ही आकडेवारी मिळवलीय असा संतप्त सवाल निर्माण झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.