नवी दिल्ली : या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईचे प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे मुख्य अतिथी असणार आहेत. यावर्षी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये पहिल्यांदा सुरक्षा दल देखील सहभागी होणार आहे. शेख हे स्वत: सैन्याचे उप-कमांडर आहेत. शेख यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंध आणखी चांगले करण्यासाठी मदत करेल.
२०१६ मध्ये फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद हे मुख्य अतिथी होते. फ्रान्सच्या लष्करातील एक तुकडीने देखील यावेळी परेडमध्ये सहभाग घेतला होता. शेख हे भारतात येणार असल्याने यूएईचे परराष्ट्रमंत्री अनवर मोहम्मद गरघस आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यात २० जानेवारीला पहिली बातचीत होणार आहे.
दहशतवादाविरोधात आणि सुरक्षेच्या मुद्दयांवर दोन्ही देशांमध्ये जवळीकता वाढत आहे. यूएई भारतच्या इंफ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करु इच्छितो. या दौऱ्यात ते भारत सरकारच्या सुविधा आणि रस्ते आणि राजमार्ग सेक्टरचं देखील निरीक्षण करणार आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी दुबई दौरा केला होता.