www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची पहिलीच मुलाखत `बॉम्ब` ठरलीय. मात्र या बॉम्बच्या स्फोटानं विरोधक नव्हे, तर स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच जबर जखमी झालेत. कारण यातून राहुल गांधींची प्रसिद्धी कमी आणि बदनामी जास्त झालीय. आता बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं कुणाला म्हणायचं असेल तर म्हणा बाबा...
टाइमपास चित्रपट आणि त्यातला `नया है वह` हा डायलॉग तुम्ही पाहिला असेलच... पण यापेक्षा सध्या एक नवा भन्नाट टाइमपास सोशल नेटवर्किंग साइटसवर सुरूय... काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली पहिलीवाहिली मुलाखत हा सध्या सर्वात मोठा जोक बनलाय...
मुलाखतीत कोणताही प्रश्न विचारला की, राहुलबाबा एकच रट लावत होते... महिला सबलीकरण, युवा सशक्तीकरण, माहितीचा अधिकार आणि भ्रष्टाचार विषयक प्रलंबित कायदे... प्रश्न आणि उत्तर यांचा काहीएक ताळमेळ लागत नव्हता. त्यामुळं फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप, यु-ट्युब अशा सर्वच सोशल नेटवर्किंग साइट्सवर या मुलाखतीवरून सॉलिड धम्माल उडालीय. मुलाखत पाहून अनेकांना आठवण झाली ती कॉमेडियन कपिल शर्माच्या कार्यक्रमातल्या गुत्थीची...
राहुल गांधींची उत्तरंही गुत्थीला लाजवणारीच होती... पार्टी-वुमन एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट-काँग्रेस.. काँग्रेस युथ, युथ-आरटीआय, आरटीआय-सिस्टीम, सिस्टीम-पार्टी... असा सगळा सावळागोंधळ सुरू होता...
त्यावरून राहुल गांधींची यथेच्छ टर उडवली जातेय... या मुलाखतीनंतर राहुल गांधींच्या विनोदांची लाटच देशात आलीय. आधी रजनीकांत, मग आलोकनाथ आणि सध्या राहुल गांधींचाच सगळीकडे धुमाकूळ आहे... त्यातलेच हे काही नमुने....
कसे आहे राहुल जोक्स
सोनिया - बेटा राहुल, कशी झाली मुलाखत?
राहुल - काय सांगू मम्मी... सगळा हिस्ट्रीचा अभ्यास करून गेलो आणि त्यांनी मॅथ्सचे प्रश्न विचारले...
प्रियंका - काय भय्या, कशी झाली मुलाखत?
राहुल - अगं दीदी, सगळे सिलॅबसच्या बाहेरचे क्वेश्चन विचारले होते...
(या मुलाखतीनंतर चिडलेल्या पत्रकाराने सोनियांची भेट घेतली...)
मुलाखतकर्ता - मै क्या पूछ रहा है... वो क्या बोल रहा है...
सोनिया - नया है वह...
लोकसभा निवडणुकांच्या तोडांवर राहुल गांधींना प्रोजेक्ट करण्याचे खटाटोप काँग्रेस पक्ष करतंय. त्यासाठी पीआर एजन्सींची मदत घेतली जातेय. ही पहिली मुलाखत हा देखील पीआर एक्सरसाइजच होता, असं म्हटलं जातं. मात्र या परीक्षेत पप्पू साफ फेल झाला. आता `गिरे तो भी टांग उपर` या न्यायानं राहुलबाबाचं समर्थन करण्याची पाळी काँग्रेस प्रवक्त्यांवर आलीय. `हात दाखवून अवलक्षण,` ही म्हण ज्यानं कुणी जन्माला घातली, तो राहुल गांधींना भेटला असणार, एवढं नक्की...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ