हा व्हिडिओ पाहून 'गतिमान एक्सप्रेस'च्या वेगाचा अंदाज येईल

मुंबई : देशातील सर्वात जलद असणाऱ्या 'गतिमान एक्सप्रेस'ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत हिरवा झेंडा दाखवला.

Updated: Apr 5, 2016, 01:47 PM IST
हा व्हिडिओ पाहून 'गतिमान एक्सप्रेस'च्या वेगाचा अंदाज येईल  title=

मुंबई : देशातील सर्वात जलद असणाऱ्या 'गतिमान एक्सप्रेस'ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत हिरवा झेंडा दाखवला. दिल्ली ते आग्रा हे १८८ किलोमीटरचे अंतर ही ट्रेन केवळ १०० मिनिटांत पार करेल अशी या ट्रेनची क्षमता आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर इतका आहे. ही ट्रेन धावू शकेल असे विशेष रुळ दिल्ली - आग्रा मार्गावर बसवण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी ही ट्रेन पहिल्यांदा दिल्ली - आग्रा मार्गावर प्रवाशांसह धावली. पाहा या जलद ट्रेनचा जबरदस्त व्हिडीओ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही ट्रेन किती जलद आहे याचा तुम्हाला अंदाज येऊ शकेल.