पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक

पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक केली गेलीय. कोस्टगार्डनं दोन्ही नाविकांना अटक केलीय. हे भारतीय नाविक बोट घेऊन पाकिस्तानच्या सीमाभागात घुसले होते. 

Updated: Jan 4, 2015, 06:15 PM IST
पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक  title=

नवी दिल्ली: पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक केली गेलीय. कोस्टगार्डनं दोन्ही नाविकांना अटक केलीय. हे भारतीय नाविक बोट घेऊन पाकिस्तानच्या सीमाभागात घुसले होते. 

पाकिस्तानच्या बोटीवर भारतीय नाविक पाक नागरिकांबरोबर त्यांच्या बोटीवर जेवले सुद्धा होते. या भारतीय बोटींची नाव नारायण आणि नारायणी आहेत. 25 डिसेंबरला भारतीय नाविक पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेले. याचदरम्यान कोस्टगार्डकडून तिन्ही बोटींची तपासणी करण्यात आली. कोस्टगार्डला पाहून लगेचच पाकिस्तानी बोट लगेच परतली. 

कोस्टगार्डला भारतीय बोटीमध्ये तपासादरम्यान काही आपत्तीजनक वस्तूही सापडल्या. 
पाकिस्तानचं दूध, सिगरेट आणि चॉकलेट भारतीय बोटीमध्ये सापडलं. यातून अनेक धागेदोरे मिळाले आणि 31 डिसेंबरला पाकिस्तानच्या एका बोटीची तपासणी करण्यात आली. ही तिच बोट होती ज्याचा पाठलाग पोरबंदरच्या 365 किलोमीटरपर्यंत करण्यात आला. 

या पाकिस्तानी बोटीमध्ये 4 नागरिक होते. कोस्टागार्डनं पाठलाग केल्यानंतर पाकिस्तानी बोटीनं नंतर स्फोट घडवून आणला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.